यवतमाळ :- भाजपाचे फायरब्रांड नेते गोपिचंद पडळकर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत. पडळकर उद्या दि. १५ एप्रिल रोजी जिल्हा दौरयावर येणार असुन ते लोकसभा मतदार संघातील पुसद, दारव्हा, यवतमाळ आणि बाभुळगाव तालुक्यात सभा घेणार आहेत.
भारतीय जनता पक्षातील उमदे वक्ते तथा फायरब्रांड नेते म्हणुन ओळखले जाणारे गोपिचंद पडळकर आज जिल्हयात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. पडळकर सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान बेलोरा ता. पुसद येथे कार्यकर्ता मेळाव्यास संबाधीत करणार आहेत. त्यानंतर दुपारी १ ते २ दरम्यान निधी मंगल कार्यालय दारव्हा येथे कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता उत्सव मंगल कार्यालयात सभेला उदबोधन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पिंपळगाव ता. बाभुळगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यास संबोधीत करणार आहेत. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना लोकसभा क्षेत्रात अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सहकार, क्रिडा, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्राचा अभ्यास असलेला उमेदवार मिळाल्याने यवतमाळ - वाशिम मतदारसंघातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.