संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कामठी शहरातील गोकुलधाम येथे नुकतीच सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी माँ भगवती सेवा समिती कामठी चे प्रमुख पूजा सफेलकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या खात्यांमार्फत राज्यातील विविध विकास योजनांची माहिती दिली.यासोबतच जनकल्याण योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच पुजा सफेलकर यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी सत्यजित शर्मा,प्रणय पैडलवार,शुभम खांडरे आदी उपस्थित होते.