मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिली रिपब्लिकचे राष्ट्रपती गॅब्रिएल बोरीक फाँट यांची सदिच्छा भेट घेऊन विविध क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा केली.
आज हॉटेल ताज येथे झालेल्या या सदिच्छा भेटीच्या वेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, भारताच्या चिली येथील उच्चायुक्त अभिलाषा जोशी, चिली रिपब्लिकचे शिष्टमंडळ, राजशिष्टाचारच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर , अतिरिक्त मुख्य सचिव (पणन) डॉ. राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अंबलगन, परराष्ट्र मंत्रालय संचालक विनय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तभ धवसे व संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी, पणन, उत्पादन क्षेत्र, उद्योग त्याचप्रमाणे माध्यमे ,तंत्रज्ञान, एआय यासह विविध क्षेत्रात असलेल्या भविष्यातील संधी आणि या क्षेत्रांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात पूरक वातावरण असल्याचे सांगून त्यादृष्टीने संयुक्त काम करण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा केली.