अरोली :- दिनांक 25 डिसेंबर बुधवार ला भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवस हा सुशासन दिवस म्हणून चाचेर निमखेडा जिल्हा परिषद सर्कल, चाचेर मंडळ अंतर्गत येणाऱ्या चाचेर येथील बरबटे कॉम्प्लेक्स मध्ये साजरा करण्यात आला.
प्रथम वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पमाल्यार्पण, प्रतिमेचे पूजन, वाजपेयी यांच्या कवितेचे वाचन ,त्यांच्या कार्याविषयी, योगदान विषयी चर्चा करून जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे, अशोक बावनकुळे, अशोक गडे, राकेश चव्हाण ,रजत महादुले, नंदू मेहर, सुभाष खेरगडे ,कैलास सोमनाथे, अनुराग बादुले ,जीवन सहारे, प्रवीण किरपान, समीर झाडे, सुरज कुलरकार, सुनील नगरे, उमेश महादुले, शेखर बावनकुळे, महेश महादुले व चाचेर मंडळ अंतर्गत येणारे भाजपा कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.