अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया :- जिल्ह्यातील उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात दिनांक 28 सप्टेबंर रोजी मुल्ला सहवनक्षेत्रातील झुंझारीटोला बिटसंरक्षीत वन कक्ष क्र. 1614 मध्ये दोन सागवन थुट निदर्शनास आले होते. सदर थुटांवरुन चोरीला गेलेल्या मालाचा शोध उत्तर देवरी वनविभातर्फे घेण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे देवरी तालुक्याच्या मौजा जमनापुर येथील गोपाल काशिराम गेडाम व गोपाल श्रीपत भंडारी यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्यांच्याकडुन सागवन 03 नग घ.मी. 0.459 व सागवन चिराण माल 48 नग घ.मी. 1.166 एकुण 65,154/- किंमतीचा मुददे माल हस्तगत करण्यात उत्तर देवरी वनविभागाला यश आले. वरील दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33(1) क फं, 41 (1), 42 (1), 51 व 52 महाराष्ट्र वननियमावली 2014 चे कलम 31 अन्वये वनगुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली. न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय देवरी यांनी प्रकरणाच्या पुढील चौकशीकरीता आरोपींना पाच दिवसाची न्यायालयीन वन कोठडी मंजुर केली. पुढील तपास कुलराज सिंह, उपवनसंरक्षक वनविभाग गोंदिया, प्रदिप पाटील, सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया व सचिन धात्रक, वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.