अमरदिप बडगे, प्रतिनिधी
पुराडा येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
गोंदिया :- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे आज केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सहेसरामजी कोरोटे यांनी शिक्षकांना भाऊक होऊन आव्हान करीत सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांना खेळासोबतच उच्च दर्जाचे शिक्षण द्या गुरुजी, माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर,आय.टी. इंजिनिअर आणि उच्च पदावर गेलेले पाहायचे आहे गुरुजी.
आज पुराडा येथे नऊ शाळेतील विद्यार्थ्यांचे बिजेपार केंद्राचे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेला शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पुराडा येथे सुरुवात झाली त्यावेळी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेसरामजी कोरोटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यावेळी प्रास्ताविकात बोलताना शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असुन क्रीडा स्पर्धा खेळभावनेने खेळले गेले पाहिजे, या क्रिडा स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा पुराडा,बिजेपार,जमाकुडो तसेच अनुदानित आश्रमशाळा ठाणा,पिपरीया, सालेकसा,सालेगाव,मकरधोकडा,कामठा इत्यादी शाळेतील २४३ मुले २२४ मुली असे एकूण ४६७ तसेच २४ क्रिडा शिक्षक व १२ चतुर्थ कर्मचारी इत्यादी सहभागी झाले, उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पुराडा चे सरपंच रमेश साखरे, प्रमुख पाहुणे प.स.सदस्या ममता अंबादे, मुख्याध्यापक प्रभाकर चोपकर, प्रभुदास कळंबे, कमल कापसे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंगला वट्टी, पोलिस पाटील सुभाष अंबादे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.आर.सोनवाने, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गाते, सामाजिक कार्यकर्ते मानिकबापू आचले उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रमात पुराडा आश्रमाच्या विद्यार्थ्यिनीनीं आदिवासी नृत्य व मराठी लावणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाचे पथसंचलन विजयकुमार टेंभरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.वैजयंती नैनावत तसेच आभार प्रदर्शन सुजाता मेश्राम यांनी केले.