संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन ची शेती केली असून या सोयाबीन पीकावर येलो मोझ्याक सारख्या व्हायरस रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिके हाती येण्याआधीच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तेव्हा तहसील प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेती भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी अनिल निधान यांनी तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर केले.
कामठी तालुक्यातील काही भागात सोयाबीन पिकावर एलोमोझ्याक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक पूर्णता धोक्यात आले आहे.सोयाबीन पिकाचे पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.या शेवटच्या टप्प्यात सोयाबीन पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सोयाबीन पिकावरील शेंड्याकडली पाने पिवळी पडत असल्याने झाड वाळून जात आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे याकडे तहसील प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची वास्तुस्थितिची जाणीव करून देण्यासाठी वाळलेल्या सोयाबीनपिका सह तहसीलदार अक्षय पोयाम ला निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणीचे निवेदन माजी जी प सदस्य व भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष व भुगाव ग्रा प सदस्य जितेंद्र मेहरकुळे , सेवक उईके, उमेश रडके,किशोर बेले, किरण राऊत,सुरेश ढोले,सचिन डांगे, रवी माटे,विक्की चौधरी,सरपंच विलास भोयर आदी उपस्थित होते.