संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करून सोयाबीन पिकवनाऱ्या शेतकरी बांधवांना अत्यंत कमी भाव मिळत आहे. यामुळे कामठी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.शेतकरी बांधवांना या हंगामात आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असल्यास सोयाबीन ला 8 ते 10 हजार रुपये भाव द्या अशी मागणी माजी जी प अध्यक्ष व कांग्रेस नेते सुरेश भोयर यांनी केली आहे.
कामठी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात धानपिकासह सोयाबिन पीकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.आणि यावर्षी धानाच्या तुलनेत सोयाबीन पिकावर जोर देण्यात आला मात्र उशिरा झालेल्या पेरण्या,अतिवृष्टी,ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पडलेला पावसाचा खंड व एलो मोझ्याक सारख्या रोगाचा झालेला मोठा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.मुळात यंदा सरकारने सोयाबीन ला 4600 रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे.मात्र बाजारात यापेक्षाही कमी दर मिळत आहे.त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होऊन सोयाबीन ची शेती तोट्यात आली आहे.तेव्हा सोयाबीनचा उत्पादन खर्च बघता सोयाबीनला किमान प्रति क्विंटल 8 ते 10 हजार रुपये दर मिळणे गरजेचे आहे.
पिकविम्याची अग्रिम रक्कम देण्यात यावी .एलो मोझ्याक ने बाधित शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा,खरीप 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात यावी. सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे ही जाणीव लक्षात घेऊन सोयाबीन ला प्रति क्विंटल 10 हजार रुपये दर देण्यात यावा अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केले आहे.