संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद ला नुकतेच 2 फास्ट रिस्पॉडर फायर बुलेट ,चार सिलिंडर सह प्राप्त झाले आहे या फायर बुलेटवर फायर फायटिंग सिस्टीम बसवली आहे हे इथं विशेष!तर ह्या दोन्ही फायर फायटर बुलेट मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या वतीने 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
ज्या ठिकाणी अग्निशमन वाहन पोहोचू शकत नाही अशा अरुंद रस्ते,गल्ली बोळातील जागा तसेच झोपडपट्टीच्या ठिकाणी अग्निशमन सेवा देता याव्या यासाठी महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या अग्निष्मणसाठी सुसज्ज असे वाटर मिस्ट फायर एक्सटिंगयुशर मोटर बाईक आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक फस्ट रिस्पॉडर बुलेट वितरित करण्यात आल्या त्यानुसार कामठी नगर परिषद ला ह्या दोन फायर फायटर बुलेट वाहनांची भेट देण्यात आली.ह्या बुलेट वाहन शहरातील गल्लीबोळात जाऊन आगीवर 3 मीटर ते 12 मीटर अंतरावरून तसेच 30 फूट उंचीपर्यंत पाण्याचा फवारा मारू शकतात अशी माहिती मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिली.