गडचिरोली : दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ पासुन महाशिवरात्री निमित्य जिल्हयातील विविध भागात यात्रा व जत्रांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने यात्रा-जत्रा दरम्यान इतरत्र ठिकाणाहून भाविक दर्शनाकरीता येत असतात. जिल्हयानिकट असलेल्या चंद्रपुर जिल्हयातील आवळगांव येथे यात्राचे आयोजन केले जाते. यदर यात्रेला भाविकांची खुप गर्दी असते. सदर यात्रेकरीता गडचिरोली जिल्हयातील आरमोरी/इतर तालुक्यातील नदी काठच्या गावांतील भाविक दर्शनाकरीता जास्तीत जास्त संख्येने जात असतात. सदर दर्शनाचे ठिकाण हे नदीच्या दुसऱ्या टोकावर म्हणजेच चंद्रपुर जिल्हयाऱ्या सिमेमध्ये आहे. सदर ठिकाणी जाण्याकरीता वैनगंगेच्या पात्रातुन नदी ओलांडून भाविकांना जावे लागते या दरम्यान अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअर्थी, दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ पासुन महाशिवरात्री निमित्य गडचिरोली जिल्हयानिकट असलेल्या चंद्रपुर जिल्हयातील आवळगांव येथे देऊळगाव-आरमोरी येथील वैनगंगेच्या पात्रातुन नदी ओलांडून यात्राकडे जाणाऱ्या घाट मार्ग दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ पासुन २८ फेब्रुवारी २०२३ पर्यत बंद करण्यात येत आहे. सदर यात्रेकरीता गडचिरोली जिल्हयातील आरमोरी/इतर तालुक्यातील वैनगंगेच्या पात्रातुन नदी ओलांडून भाविक जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर यात्राच्या देव दर्शनाकरीता जाणाऱ्या भाविकांची अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोणातुन सदर नदीच्या पात्रातील मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात यावे जेणेकरुन मानवहानी किंवा जिवीतहानी होणार नाही. सदर आदेशाचे उलंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. याबाबत कार्यवाहीची जबाबदारी तहसिलदार आरमोरी यांचेकडे निश्चित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.
वैनगंगेच्या पात्रातून नदी ओलांडून आवळगाव यात्राकडे जाणारा घाट मार्ग १८ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत बंद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com