नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे आणि अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आपल्या प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर मनपातून सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्तीच्या छोटेखानी कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रमोद गावंडे यांना मानाचा दुपट्टा, पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त प्रमोद वराडे, मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, अर्चना येलचेटवार, नगर रचनाकार ऋतुराज जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी चंदनखेडे, अमोल चौरपगार, मंगेश गेडाम उपस्थित होते.
सेवानिवृत्ती कार्यक्रमामध्ये डॉ अभिजीत चौधरी यांनी पुढील आयुष्यासाठी प्रमोद गावंडे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. विजय जोशी यांच्या सेवनिवृत्तीच्या सत्कार कार्यक्रम मध्ये अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य वैघकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. गोवर्धन नवखरे, सहाय्यक आयुक्त शाम कापसे उपस्थित होते. मनपातून 22 कर्मचारी सेवानिवृत्त झाले.