KTPS कंजुमर सोसायटीच्या लापरवाहीमुळे गैस सिलेंडर लिकेज दुर्घटना

– मोठी जीवितहानी टळली अन्यथा संपुर्ण सिद्धार्थ नगर जळुन खाक झाले असते.

महादुला-कोराडी :- नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत हद्दीतील सिद्धार्थ नगर वार्ड क्रमांक 9 मध्ये सिलेंडर लिकेज मुळे लागलेली आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली मात्र या दुर्घटनेत सिलेंडर जवळ जाऊन आग विझवायला गेलेला सोनु घरडे हा जवळपास 25% जळाला. त्याला नजिकच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, कांताबाई नागपुरे नामक महिलेच्या घरी स्वयंपाक करित असतांना सिलेंडर ने अचानक पेट घेतला. तिने शेजारच्या सोनु घरडे नामक मुलाला मदतीसाठी हाक मारली. तो जवळ जाताच आगीच्या भपक्याने त्याचे दोन्ही पाय व हाताला चटके बसले त्यात तो जवळपास 20% जळाला. नशिब बलवत्तर म्हणून तो वाचला. सिद्धार्थ नगर परिसर तसा गजबजलेला. दाट वस्ती व एकमेकांना चिटकुन घरे असलेली वस्ती जर आग लागलेल्या सिलेंडर चा ब्लास्ट झाला असता तर कदाचित या वस्तीतील गोरगरिबांची 100 च्या वर घरे जळुन खाक झाली असती तसेच जीवितहानी सुद्धा टाळता आली नसती हे विशेष. आगीच्या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तिलकचंद गजभिये, यांनी महादुला नगरपंचायत येथील अग्निशमन दलाला फोन केला. नगराध्यक्ष राजेश रंगारी, मुख्याधिकारी रुचा धाबर्डे, नगरसेवक महेश धुडस, पंकज ढोणे व पवन पखिड्डे हे घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करीत आग लागलेले सिलेंडर तात्काळ अग्निशमन दलाच्या पाईप ने मारा करीत विझवले व ते सिलेंडर घरातुन बाहेर काढीत आग नियंत्रणात आणली.                                                                                                       KTPS को आपरेटिव सोसायटी चा हलगर्जीपणा भोवला   स्थानिक केटीपीस कोआपरेटिव सोसायटी चे या परिसरात हजारो ग्राहक आहेत. आणि प्रत्येक ग्राहकांकडे सिलेंडर हाताळणी पासुन तर एखाद्या लिकेज सिलेंडर ला अचानक आग लागल्यास ती कशी विझवायची यासंबंधी कोणतेही डेमो प्रात्यक्षिक राबविले जात नाही किंवा कंजुमर इन्स्पेक्शन विजीट केली जात नाही. परंतु इन्स्पेक्शन च्या नावाखाली KTPS कंजुमर कोआपरेटिव सोसायटी ही कंजुमर कडुन शेकडो रुपयांची अवैध वसुली करण्याच्या पावत्या फाडतात हे बेकायदेशीर आहे. आज लागलेल्या आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविले म्हणून ठीक झाले अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती तर KTPS कोआपरेटिव सोसायटी ला मोठा भुर्दंड सोसावा लागला असता आणि ही एजंसीच बंद करावी लागली असती.

आगीने होरपळलेल्या सोनु घरडेस नुकसानभरपाई देण्याची नगरसेवक गजभिये व सुनील साळवे यांची मागणी

या दुर्घटनेत जख्मी सोनु घरडेस KTPS को आपरेटिव सोसायटी कडुन अतितात्काळ सोनु घरडे या युवकास मेडिकल उपचारासाठी आर्थिक मदत करावी तसेच लिकेज सिलेंडर मुळे नुकसान ग्रस्त कांताबाई नागपुरे या महिलेस आर्थिक मदत करण्याची मागणी नगरसेवक तिलकचंद गजभिये व सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी केली आहे तसेच वेळोवेळी कंजुमर इन्स्पेक्शन विजीट, सिलेंडर गळती तक्रारी आणि सिलेंडर ला आग लागल्यास आग कशी विझवायची याचे डेमो अभियान राबवावे अशी मागणी केली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक वाहतूक प्रतिबंधित

Fri Apr 28 , 2023
– मनपा आयुक्तांचे आदेश: २४ मे पर्यंत वाहतूक बंद  नागपूर :- सिमेंट रोडच्या बांधकामाकरिता ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक (शिव मंदिर पर्यंत) पर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉक्रीट रोड नागपूर शहर टप्पा १ अंतर्गत (उर्वरीत काम) ईश्वर नगर चौक ते ज्योती शाळा चौक (शिव मंदिर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com