नागपूर :- सकल माळी समाजा तर्फे माळी समाजात ज्यांनी जन्म घेतला असे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी गोरगरीबांच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. असे गुरुशिष्य जयंती सोहळ्याचे आयोजन दि. १४ एप्रिल २०२४ ला आयोजन करण्यात आले आहे. सावता लॉन, शाहू नगर, मानेवाडा रोड, नागपूर येथे सायंकाळी ६.०० वाजता. सकल माळी समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे, आयोजकांनी विनंती केली आहे. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे.