संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29 – येत्या 31 ऑगस्ट पासून दहा दिवसीय गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात होणार आहे.शासनाकडून गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याची घोषणा केली असली तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहेत ज्यामध्ये शहर वाहतूक शाखा, पोलीस विभाग,नगर परिषद,अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र , आदी नाहरकत पत्राची पूर्तता केल्यानंतरच परवानगी दिले जाणार आहे तर या परवानगी साठी श्री गणेशभक्तांची काळजी घेत या सर्व परवानगी एकाच ठिकाणी प्राप्त व्हाव्यात यासाठी कामठी नगर परिषद कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.तेव्हा सर्व गणेशोत्सव मंडळानी या एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कामठी नगर परिषद चे अग्निशमन पर्यवेक्षक निखीलेश वाडेकर यांनी केले आहे.
कामठी नगरपालिकेतच एक खिडकी योजना राबविण्यात येत असून फक्त कामठी व जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसरातील गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी सोयीचे होऊन संबंधित विविध ठिकाणी परवान्यासाठी भटकंती न व्हावी यासाठी नगर परिषद कार्यलयातच एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा 31 ऑगस्ट पासून सुरू होणार असला तरी आतपर्यंत 40 गणेशोत्सव मंडळांनी नगर परिषदकडून परवानगी अर्ज घेऊन गेले असले तरी फक्त सहा अर्जदारांनी ना हरकत प्रमाणपत्र घेतले तर 20 अर्जदारांनी अग्निशमन विभागाची परवानगी घेतले आहेत.
या एक खिडकी योजनेत कामठी नगर परिषद चे सहाययक नगर रचना अभियंता विक्रम चव्हाण, अग्निशमन पर्यवेक्षक निखिलेश वाडेकर, कनिष्ठ लिपिक दीपक जैस्वाल,पोलिस विभागाचे घनश्याम वाघमारे,वाहतुक शाखा कामठी चे पोलीस उपनिरीक्षक अनिल चौधरी आदी भूमिका साकारत आहेत.
-श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी छावणी परिषद चा नकार
31 ऑगस्ट पासुन सुरू होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सव अंतर्गत दरवर्षी श्री गणेश मूर्ती विसर्जन ढोल ताशाच्या गजरात कामठी कॅन्टोन्मेंट परिसरात येणाऱ्या महादेव घाटावर विसर्जित करण्यात येते मात्र यावर्षी छावणी परिषद प्रशासनाने या महादेव घाटावर श्री गणेश मूर्ती विसर्जन करू देण्यास नकार दिला हे इथं विशेष!!