नागपूर :- बालमित्र सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ वर्षांपूर्वी स्थापन झालेले आहे, या मंडळातर्फे नेहमी सामाजिक व रचनात्मक कार्य करण्याची प्रथा आहे. यावर्षी नागरिकांच्या वर्गणीतून नेहमी हा उत्सव करण्यात येतो. यावर्षी गौसेवा व ग्रामविकास करणाऱ्या निसर्गानंद ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष मुन्नाजी महाजन यांनी आमच्या मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांना पर्यावरण व गौरक्षा याकरिता कार्य करण्याची आवश्यकता याबद्दल माहिती दिली. या जनसेवेच्या उत्तम कार्यासाठी आमच्या मंडळाच्या वर्गणीतून निसर्गानंद ग्रामविकास फाऊंडेशनचे मुन्ना महाजन व भगवानदास राठी यांना ११ हजाराचा निधी (गौरक्षण व वृक्षारोपण व इतर कार्यासाठी) माननीय पोलीस निरीक्षक (गणेशपेठ) घाडगे साहेबांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मुळे, नयन येवले, आर्यन बांगडे, प्रवीण तायवाडे, जितेंद्र घुले, मोहन पाठक, समीर शेंडे, आशिष चिटणीस, धीरज निकम, भावेश पिये, सैनक मने, अविनाश वासेकर, रोशनी कोल्हे, भावना वासेकर, लिला पेशले, दया ठाकरे, निधी शेंडे, नगला वासेकर, चारू अतकरे व इतर मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रविण तायवाडे यांनी सांगितले.