नागपूर :- गण सुरक्षा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष व आसाम राज्याचे अपक्ष खासदार नवकुमार सरनिया यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रतील नागपूर येथे पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. आदिवासी बहुल मानवतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून गणसुरक्षा पार्टीकडे बघितले जाते. खासदार नवकुमार सरनिया यांची कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी गण सुरक्षा पक्षात प्रवेश केला. हजारो आदिवासी बांधवांनी गण सुरक्षा पार्टीमध्ये प्रवेश करतेवेळी खासदार नव कुमार सरनिया यांनी नागपूर हे गोंड राज्यांचे शहर आहे आणि गोंड राजांची राजधानी असलेले नागपूर येथे गन सुरक्षा पार्टीचे मोठे राजनैतिक करिअर बनणार आहे, असे मत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र मध्ये नागपूर मधून कार्पोरेशन असो वा विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावर लढवून विजय मिळवू असेही खासदार सरनिया यांनी सांगितले.
एकीकडे काँग्रेस इंडिया गटबंधन बनवून सर्व लहान मोठ्या गटांना सोबत घेत आहे तर दुसरीकडे भाजपा पुन्हा सत्तेत यावे म्हणून लोकांना प्रलोभन देत आहे, अशातच गन सुरक्षा पार्टीचे नागपूरमधील कार्यकर्ता मेळावा व कार्यकर्त्यांचा प्रवेश हा मात्र एक अनोखा उपक्रम दिसून आला. खासदार नवकुमार सरनिया यांच्या मते आदिवासी मतांचा सर्वच पक्षांनी खेळखंडोबा केला असून आता असे होणार नाही. आदिवासी बांधव जागृत झाला असून कोण आपल्या हिताचे रक्षण करणार आहे. आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणार आहे यावर विचार करू लागला आहे, आणि गणसुरक्षा पार्टी ही आदिवासी बहुल हिताचा विचार करत असल्यामुळे येत्या महानगरपालिका, विधानसभा सोबतच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी बांधव गणसुरक्षा पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच नागपूर सारखे महाराष्ट्रभर कार्यकर्ता मेळावे घेऊन पक्ष वाढी साठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सरनिया म्हणाले. यावेळी मंचावर प्रामुख्याने गण सुरक्षा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार नवकुमार सरनिया, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमाभाऊ आडे, राष्ट्रीय प्रवक्ता टोके शितल, दर्पण सिंग पाडवी, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा मडावी, नागपूर जिल्हाध्यक्ष गजानन कोकडे, कार्यक्रमाचे आयोजक मंगेश धुर्वे, प्रवीण मसराम व इतर पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.