रनाळ्यात जुगार अड्यावर धाड,7 जुगारी ताब्यात,1 लक्ष 4 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील एका पॉश टाऊनशीप च्या बाजूला मोकळ्या जागेत अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही गतरात्री 8 दरम्यान केली असून या धाडीतून सात जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करीत घटनास्थळाहुन 52 तास पत्ते, 3 महागडे मोबाईल,दोन दुचाकी व नगदी 3 हजार 780 रुपये असा एकूण 1 लक्ष चार हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जुगाऱ्यात विजय पारिसे वय 30 वर्षे रा कळमना,शिवकुमार खांडेकर वय 32 वर्षे रा कळमना,अलंकार मिश्रा वय 35 वर्षे रा रणाळा,फिरोज शेख वय 29 वर्ष रा शुभम नगर येरखेडा,अयान आरिफ शहा वय 18 वर्षे,रा कळमना,शैलेश मुळेवार वय 31 वर्षे रा रणाळा,रोशन गिरी वय 35 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम, एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वांना एकत्र आणणाऱ्या ‘ओणम’च्या मूल तत्वांचे सर्वांनी पालन करावे - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Mon Sep 23 , 2024
मुंबई :- देशात साजरा केला जाणारा प्रत्येक सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. ओणम हा प्राचीन सण साजरा करताना केरळीय समाजामार्फत सांस्कृतिक वारसा जपला जातो, ही उत्साहवर्धक बाब असून सर्वांनी आजही समर्पक असणाऱ्या एकता, करुणा आणि सेवा या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. बॉम्बे केरळीय समाजाच्या वतीने आज मुंबईत ओणम उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com