नरखेड हद्दीमधील जुगार अड्‌डयावर धाड

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई 

नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील मौजा मानिकवाडा शिवारात काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे नरखेड येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी मौजा मानिकवाडा शिवार येथे सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) भरतसिंग ओंकारसिंग चौहान, वय ३० वर्ष रा. बेलोना २) कमलाकर भाऊराव बारमासे वय २३ वर्ष रा. बेलोना ३) धनराज उकंडराव चरपे, वय २५ वर्ष रा. बेलोना ४) शुभम रमेश सातपुते, वय २३ वर्ष रा. नरखेड हे जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०४ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन नगदी ७८५०/- रुपये व ५२ तासपने तसेच हिरो कंपनीची मो.सा. क्र. एम.एच.-४०/सि.आर.-८१८५ असा एकुण ७२,८५०/- रु. बा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे नरखेड येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे नरखेड येथील ठाणेदार सपोनि अजित कदम, पोलीस उपनिरीक्षक देविदास ठमके, पोना स्वप्नील बोंडे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Sat Sep 14 , 2024
नागपुर :-दिनांक १२.०९.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केस सेसमध्ये एकुण ०७ ईसमांवर कारवाई करून ८,४३५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगार कायद्यान्वये ०४ केसमध्ये एकुण ११ ईसमांवर कारवाई करून ७,२५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २,८७३ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com