फुटाळा तलावातील संगीत कांरजे पाहण्यासाठी 400 आसन क्षमतेची   दर्शक गॅलरी  तसेच  बारा मजली फूड-प्लाझा  1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह  उभारण्यात येणार  

-केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी  यांची माहिती 

   नागपूर  –  नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलावात असणारे संगीत कारंजे नागपूरचा इतिहास सांगणार असून या इतिहासाची हिंदी मधली कॉमेंट्री अमिताभ बच्चन यांच्या आवाजात तर मराठीतली कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात राहील. हे कारंजे पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ दर्शक गॅलरी ही 400 आसन क्षमतेची राहणार असून फुटाळ्याच्या पुढेच बारा मजली फूड-प्लाझा  1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह  उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये दिली. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्वी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  नागपूर शहरातील गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांसह पाहणी केली ,त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते निधी मधून 30 कोटी रुपये पंजाबराव कृषी विद्यापीठाला देण्यात आले असून फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. या कारंजाच्या निर्मिती साठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपूरात आले असून फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी आज गडकरी यांनी बघितली आणि पाहणी केली.

या फाऊंटेनच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार यांचेही आभार गडकरी यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित तामिळ फिल्म क्षेत्रातील गायिका रेवती यांनी सुद्धा या प्रकल्पाच्या संगीत नियोजना विषयी माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

देवेंद्र फडणवीस को राज ठाकरे का खत, आपने तो मिसाल ही कायम कर दी

Sat Jul 2 , 2022
मुंबई  – महाराष्ट्र के पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस को उपमुख्यमंत्री बनाए जाने पर तमाम नेताओं ने हैरानी जताई है। कुछ नेताओं ने उन पर डिप्टी सीएम का पद स्वीकारने पर तंज कसा है तो कुछ लोगों ने भाजपा के फैसले पर ही सवाल उठाए हैं। इस बीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे ने भी देवेंद्र फडणवीस को चिट्ठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com