वरोरा शहरात सुसज्ज रंगमच हवा – किशोर टोंगे

वरोरा : नाट्य कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी वरोरा शहरात सुसज्ज रंगमंच व्हावा, असे प्रतिपादन किशोर टोंगे यांनी केले.

कला छंद प्रतिष्ठानच्या वतीने वरोरा शहरात आयोजित सून सांभाळा पाटलीन बाई या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उदघाटन युवा नेते किशोर टोंगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

वरोरा शहराची जिल्ह्यात एक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे मात्र शहरात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एक सुसज्ज सभागृह किंवा रंगमंच उपलब्ध नाही असे ते म्हणाले यासाठी ते शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

पूर्व विदर्भात असलेली झाडीपट्टी नाट्य चळवळ ही अत्यंत दर्जेदार कलावंत व संहिता असेलली चळवळ असून तिला मुख्य प्रवाहात स्थान मिळणे गरजेचे आहे. तसेच यात कामं करणाऱ्या कलावंतांना चांगले मानधन आणि इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

वरोरा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत चांगलं आणि दर्जेदार नाटक आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी उदघाटन सोहळ्यास माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत मोरेश्वर टेमुर्डे, शिवसेनेचे रवींद्र शिंदे व दत्ता बोरेकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

Tue Jan 24 , 2023
मुंबई :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 26 जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज झाली. यावेळी सहसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार सिंह यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!