प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर इच्छुक नागरिकांना आजपासून आक्षेप , हरकती नोंदविता येतील–मुख्याधिकारी संदीप बोरकर

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 9:-सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून येत्या दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच राज्य निवडणूक आयोगाने आदेशीत केलेल्या सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम 2022 नुसार कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी कामठी नगर परिषद तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर इच्छुक नागरिकांनी आज 10 मे ते 14 मे 2022 च्या कार्यालयीन वेळेपर्यंत कामठी नगर परिषद कार्यालयात सूचना , हरकती व आक्षेप लेखि स्वरूपात नोंदवावे त्यांनतर आलेल्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही असे आव्हान कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे.
कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असून यावर प्रशासक कार्यरत आहेत.प्रशासक नेमल्यानंतर सहा महिण्याच्या आत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी विराजमान होणे आवश्यक आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या 22 फेब्रुवारी 2022 च्या परिपत्रकानुसार नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता .त्यानुसार कामठी नगर परिषद च्या वतीने 10 मार्च 2022 ला एकूण 17 प्रभागाची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यासाठी 10 मार्च ते 17 मार्च पर्यंत हरकती, आक्षेप व सूचना नागरिकांकडून मागविण्यात आल्या होत्या त्याप्रसंगी एकूण 10 अर्जदारांनी आक्षेप नोंदविला आहे.मात्र वेळीच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेत राज्य शासनाने यात खोडा घातला व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.त्यावर 11 मार्च ला या प्रभाग रचनेवर स्थगिती आणण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 ला दिलेल्या सुनावणी निकालात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या व येत्या दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यात सुधारित प्रभाग रचना कार्यक्रम दीला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कारवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यापासून सुरू करावी असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.त्यानुसार निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कारवाहीच्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद कार्यालयात प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यावर इच्छुक नागरिकांना 10 मे ते 14 मे या कालावधीत आक्षेप, हरकती, सूचना नोंदविता येतील.यावर 23 मे 2022 पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी देतील.तसेच जुन्या प्रभाग रचना कार्यक्रमा दरम्यान 10 मार्च 2022 कार्यक्रमानुसार त्यावेळी नोंदविलेल्या आक्षेप, हरकती व सूचना वर एकत्रित सुनावणी घेण्यात येईल.तर अंतींम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गादा येथे करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू

Mon May 9 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 9:- ,स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील गादा येथे करंट लागून तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारला रात्री आठ वाजता सुमारास घडली असून अनिकेत मनोज सिंग वय 18 असे मृत तरुणाचे नाव आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गादा येथे इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीच्यावतीने कन्हान नदी येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!