15 ऑक्टोंबर पासून मौदा पंचायत समितीचे सर्वच कर्मचारी निवडणुकीसाठी रिलीव्ह – गट विकास अधिकारी विजय झिंगरे,तरीही 19 ऑक्टोबरला नांदगाव येथील बंगला चौकात शुभेच्छांचे बॅनर कायम

कोदामेंढी :- येथील सरपंच आशिष बावनकुळे यांनी केलेल्या 3,88,474 रुपयाच्या पथदीप घोटाळ्याची ऑनलाइन तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी गट विकास अधिकारी ते उपमुख्यमंत्री कार्यालय ,ठाणेदार ते पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना 15 ऑक्टोंबर पासून करण्यास सुरुवात केली.

तक्रारीवर कोणती कारवाई केली याबाबत विचारपूस करण्यासाठी मौदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय झिंगरे यांना 18 ऑक्टोबरला भ्रमणध्वनीवरून विचारपूस केली असता, त्यांनी ग्रामपंचायत कोदामेंढीच्या पथदीप घोटाळा विषयीघोटाळा विषयी कोणतीही तक्रार टपाली द्वारा आले नसल्याचे सांगितले, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी ऑनलाइन केले असल्याचे सांगितले असता, तक्रारी ऑनलाईन पाहायला इथं कोणतेच कर्मचारी उपलब्ध नाही 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागतात सर्वच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी रिलीव्ह केल्याचे त्यांनी सांगितले. मी पण सध्या निवडणुकीच्याच कामात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

15 ऑक्टोंबर पासून बीडीओसह संपूर्ण पंचायत समिती मौदा येथील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतानाही 19 ऑक्टोबरला नांदगाव येथील रामटेक भंडारा महामार्गावरील बंगला चौकात सकाळी फेरफटका मारला असता त्या चौकात शुभेच्छांचे बॅनर कायम असल्याचे दिसले. त्यामुळे गट विकास अधिकारी व रिलीव्ह झालेले कर्मचारी , निवडणुकीचे कामे सोडून दुसऱ्याच कामात तर व्यस्त नाही ना? नेते, त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बारमध्ये पार्ट्या करण्यात तर व्यस्त नाही ना? एक वर्षांपूर्वी मौदा येथील गटविकास अधिकारी विजय झिंगरे व त्यांच्या कर्मचारी वर्ग रामटेक भंडारा रोडवर स्थित रंगोली बार व दोन वर्षांपूर्वी खिंडसी येथे कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर असताना बारमध्ये बियरच्या प्याला घेण्यात व्यस्त असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या व सध्या तोच हंगाम असल्याने संबंधित वरिष्ठ विभागाने विशेष लक्ष देऊन निवडणुकीचे काम पारदर्शकपणे पार पाडावे अशी मागणी येथील परिसरातील व तालुक्यातील जागरूक मतदारांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, लुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Wed Oct 23 , 2024
नागपूर :- दिनांक २१.१०.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १७ केसेस तसेच, एन.डी.पी. एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण १८ केसेसमध्ये एकुण १८ ईसमांवर कारवाई करून १,०५,०९५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०२ ईसमांवर कारवाई करून २,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com