नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे नागपूर शहरात पेट्रोलोंग करीत असतांना, त्यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून आरोपी मिलन यशवंत सुर्यवंशी (राजपूत), वय २५ वर्ष, रा. मोहन नगर, खलासी लाइन, सदर, नागपूर याचे घरी रेड कारवाई करून घर झडती घेतली असता, त्याचे घरून एक देशी बनावटीची गावठी पिस्टल मॅगझीनसह किंमती अंदाजे ५०,०००/- रू. ये मिळुन आल्याने तो आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आले. आरोपी वाने मा. सह. पोलीस आयुक्त यांचे मनाई आदेशाचे उलंघन केल्याने आरोपीविरूध्द पोलीस ठाणे सदर येथे कलम ३/२५ भा.ह.का, सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी सदर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि. शुंभागी देशमुख, सपोनि, गजानन चांभारे, पोहवा. राजेश तिवारी, शैलेष जांभुळकर, महेन्द्र सडमाके, दिपक योले, दिनेश डवरे, संदीप चंगोले, नापोअं. अर्जुन यादव, पोअं, सुनिल कुंवर, संदीप पांडे व कमलेश गहलोत यांनी केली.