नागपूर :- जिथे स्वच्छता असते तिथे देव वास करतो हे खरे आहे. स्वच्छतेचे महत्त्व जपत आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी “मन की बात” या कार्यक्रमातून एक तारीख एक तास एक साथ स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत प्रत्येक भारतियाला जोडण्याचे आवाहन केले आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणं आणि स्वच्छतेला सेवा म्हणून घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, हा या मोहिमेचा मूळ मंत्र असून सोमवार ला 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी श्रद्वांजली ठरेल.सीआरपीएफ केवळ युद्धक्षेत्रातच नाही तर भारत सरकारच्या प्रत्येक ऑपरेशनला यशस्वी करयात अग्रेसर आहे. सध्या स्वच्छता अभियानांतर्गत पी.आर.जांभोळकर, पुलिस उप महानिरीक्षक समुह केंद्र केरिपुबल नागपुर, आणि कीर्ती जांभोळकर अध्यक्ष प्रादेशिक कावा नागपुर, जी.डी.पढरीनाथ, कमाडेंट समुह केंद्र केरिपुबल नागपुर, आणि सर्व अधिकारी यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली 1 ऑक्टोबर 23 रोजी, सकाळी 10 ते 11 या वेळेत नागपुरातील लोकमान्य मेट्रो स्टेशन ते यशवंतराव चव्हान अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अंबाझरी पार्कप्रर्यंतचा रस्ता व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, लता मंगेशकर हॉस्पिटल आणि मेडीकल कॉलेज, प्रियदर्शनी कॉलेजच्या विधार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला, सीआरपीएफ अधिकारी, मंत्रालयिक अधिकारी / कर्मचारी, अधिनस्थ अधिकारी, जवान आणि कुटूंबीय आणि सामान्य नागरीकांसह सुमारे 1000 लोक एकत्रितपणे सहभागी झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ही मोहिम खूप मोठया प्रमाणावर राबविण्यात आली. हे विहंगम दृश्य सर्वानाच दिसले आणि स्वच्छता ही प्रत्येक वर्गासाठी आवश्यक आहे. मग सुशिक्षित वर्ग असो वा अशिक्षित वर्ग, असा संदेश सर्वसामान्याना देण्यात आला. स्वच्छता म्हणजे आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे ही प्रत्येक व्यक्तीची जवाबदारी आणि कर्तव्य आहे. याप्रसंगी पीआरओ प्रदीप द्विवेजी व अंगत चौबे यांनी परिश्रम घेतलेत.
शौर्यापासून स्वच्छतेप्रर्यंत, सीआरपीएफ च्या रूपाने अनेक जलसे, स्वच्छतेची भावना देशभक्ती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com