नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी पराभवाचा धक्का देत फ्रेन्ड्स क्लब, क्रीडा प्रबोधिनी संघांनी स्पर्धेत आगेकूच केली आहे. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे पुरुष, महिला आणि १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा सुरु आहे.
पुरुष गटात फ्रेन्ड्स क्लबने विक्रम एस.ए. संघाचा ९-५ ने पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत फ्रेन्ड्स क्लब ने गोंडवाना संघाचा १२-२ ने पराभव केला. पुरुषांच्या सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने ब्रम्हपुरी संघाचा २४-२३ असा नजीकच्या फरकाने पराभव केला. तर पुरुषांच्या अन्य सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने मेळघाट संघाचा ३१-२३ ने पराभव करुन स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.
महिला गटात धामगाव संघाने डीएमएनसी संघाला ८-२ ने मात दिली. तर अन्य सामन्यात धामणगाव संघाने भंडारा संघाचा ९-८ ने पराभव केला.
निकाल
पुरुष
१. गोंडवाना मात खेलो इंडिया १८-१३
२. अमरावती मात मेळघाट २२-११
३. अजिंक्य बी मात अकोला १९-५
४. फ्रेन्ड्स क्लब मात विक्रम एस.ए. ९-५
५. क्रीडा प्रबोधिनी मात ब्रम्हपुरी २४-२३
६. भंडारा मात सी.आर.7 १५-१०
७. क्रीडा प्रबोधिनी मात मेळघाट ३१-२३
महिला
१. फ्रेन्ड्स क्लब मात गोंडवाना १२-२
२. धामणगाव मात डीएमएनसी ८-२
३. धामणगाव मात भंडारा ९-८
१७ वर्षाखालील मुले
१. ललीता पब्लिक स्कूल मात लखोटीया सीबीएसई-ए ६-६
२. खेलो इंडिया मात एसओएस १४-६
१७ वर्षाखालील मुली
१. एसओएस मात लखोटीया-ए ९-१