शुक्रवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूरता ६ :  राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच २० स्थायी केन्द्रांवर १५ ते १८ वर्ष वयोगटातील नागरिकांनासुध्दा लस देण्यात येत आहे. शाळा आणि महाविदयालयामध्येही याची व्यवस्था करण्यात आली आहे.

            महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी जी.एस.कॉलेज मधील लसीकरण केन्द्राला भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल उपस्थित होते.

            लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल,  ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ग्लोकल मॉल, बर्डी येथील  ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १५ ते १८ वर्ष वयोगटातील तसेच १८ व ४५ वर्षावरील सर्व नागरिकांचे  कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजे पर्यत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

            तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामवाडा, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय पाचपावली, प्रगती हाल दिघोरी येथे उपलब्ध आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी नव्या शहर बसच्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे परिवहन सभापती बंटी कुकडे यांचे निर्देश

Thu Jan 6 , 2022
नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस विभागांतर्गत शहरात धावत असलेल्या २३७ बसेसचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. यापैकी ७० बसेस सी.एन.जी. मध्ये परावर्तीत करण्यात आल्या. उर्वरीत बसेसमधून शक्य त्या बसेस सी.एन.जी. मध्ये परावर्तीत करण्यात याव्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जारी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतूक धोरणाअंतर्गत इलेक्ट्रिक आणि सी.एन.जी. बसेस नव्याने खरेदी करण्यात याव्यात. त्याची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे निर्देश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com