आर्वी :-लायन्स क्लब आर्वी, लायन्स क्लब गोंदिया, हरी कृष्णा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, 14 /मे /2023 (रविवार) रोजी राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आर्वी, जिल्हा वर्धा येथे मोफत कृत्रिम हात बसवणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
👉🏼 या शिबिरात ज्यांचे हात कोपराच्या खाली कापले गेले आहेत, अशा लोकांना अमेरिकेत बनवलेले “LN4 हात” मोफत बसवले जातील.
👉🏼हा हाथ लावल्यानंतर एखादी व्यक्ती स्वत: अनेक गोष्टी करू शकते, जसे की लिहिणे, चमचा धरून खाणे, बाईक, कार किंवा सायकल चालवणे, भाकरी लाटणे, भाजी कापणे, स्वयंपाकघरातील कामे, सामान उचलणे, ब्रश करणे, मजुरीची कामे करणे अश्या बरेच काही गोष्टी करू शकतात.
👉🏼या हाताची अंदाजे उत्पादन किंमत 15000 ते 20000 रुपये आहे, जी या शिबिरात हरी-कृष्ण फाऊंडेशनतर्फे मोफत उपलब्ध करून दिली जाईल , यासाठी कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता नाही आणि हा हात कधीही घड्याळासारखा सहज वापरता येतो व कुठेही काढता येतो.
विनंती – जर तुम्ही अश्या एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल ज्याचा हात कोपरच्या खाली कापला गेला असेल आणि मूळ हाताचा किमान 3 इंच कोपरच्या खाली असेल तर ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती.
या सुविधेसाठी खालील क्रमांकावर संपर्क करून आपली नोंदणी करा.
शिबिराची तारीख – 14/5/2023 (रविवार)
शिबिराचे स्थळ -राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
आर्वी, जिल्हा वर्धा.(महाराष्ट्र)
संपर्क -(1) डॉ.रिपल रमेशराव राणे
(अपघात, संधिवात व अस्थिरोग तझ.) (ऑर्थोपेडिक सर्जन)
प्रथम प्रांतपाल,लायन्स क्लब इंटरनॅशनल.
संपर्क – 9422144936