नागपूर :-श्रीमद शंकराचार्यांची स्तोत्रे देवांना आवळतांना ममत्वभाव निर्माण करतात. ज्याप्रमाणे माता पुत्राच्या चुका क्षमा करते चुकांना क्षमा करण्याचा ममत्व भाव म्हणजे देवाला आवळणारे शंकराचार्याची स्तोत्रे आहे. ही स्तोत्रे सर्व संतांच्या विचारांची मांदीयाळी आहे. असे उदगार विघा बोकारे यांनी “शंकराचार्यांची स्तोत्रे” या विषयाचे व्याख्यान अहल्या देवी मंदिर येथे करतांना सांगितले.
व्यारव्यानमालेचे अध्यक्ष डॉ सुधीर बोधनकर होते. कार्यक्रमास सेवानिवृत्त कॅप्टन हस्तक यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्याना करीता मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते