संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामठी तालुक्यात एकूण 65 गावात विविध कामांना मंजुरी मिळाली असून येथील काही गावातील कामे पूर्णत्वास आले असून काही गावातील कामे प्रगतीपथावर आहेत मात्र कामठी तालुक्यातील बिना,कोराडी,झरप,चिकना हे चार गावे प्रशासकीय अडचणीत अडकल्याने अजूनही हे चार गावे जलजीवन मिशन च्या कामाच्या प्रतीक्षेत आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत एकल गाव योजना अंतर्गत कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 65 गावात विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत या कामातील पाणी पुरवठा विहीर, पाणी पाईप लाईन आदी कामे पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आले आहेत त्यामुळे संबंधित गावातील पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी या जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी अपेक्षित असलेले चार गावे प्रशासकीय कारणास्तव प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्राप्त माहिती नुसार कामठी पंचायत समिती अंतर्गत 65 गावे जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर झाली असून यातील तांदुळवाणी,आसलवाडा,नान्हा,चिखली,शिवणी,कुसुंबी,गारला,भुगाव,गादा, खैरी,उनगाव,पळसाड,आडका,परसोडी,खेडी, नेरला,गुमथी,वरंभा अश्या बहुतेक गावात जलजीवन मिशन ची मंजूर कामे पूर्णत्वास आली तर काही गावात ही कामे अजूनही प्रगती पथावर आहेत मात्र यातील मंजूर गावातील चार गावाचा विचार केला असता बिना गावात पुनर्वसन चा विषय असल्याने काम सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही,कोराडी च्या कामाचे टेंडर झालेले नाही,झरप तसेच चिकना अशे चार गावे प्रशासकीय कारणास्तव जल जीवन मिशन योजनेच्या कामाच्या लाभापासून वंचीत आहे .