अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त

– अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई

– मागील वर्षात 2 कोटी 61 लाख दंड आकारणी

– घरकुल योजनांसाठी गावालगतच्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

गडचिरोली :- जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत. अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी बर्डे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, तलाठी सुधीर बाविस्कर यांच्या पथकाने निवडणुकीच्या व्यस्त कामातही ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या चारही वाहने ट्रॅक्टर असून चालक गणेश यशवंत वार, भारत राऊत, सुभाष मंढरे आणि सचिन राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जिल्हयात मागील वित्तीय वर्षात 172 वाहन जप्त करण्यात येवून त्यातील 248 प्रकरणात 2 कोटी 61 लाख रुपये दंड आकारण्यात आला होता, त्यापैकी 1 कोटी 39 लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

जिल्हयात इंदिरा घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल योजने अंतर्गंत दुर्बल घटकातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी 5 ब्रास पर्यंत रेती विना मुल्य उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हयातील आमगांव, (ता. चामोर्शी), थुटेबोडी व वैरागड (ता. आरमोरी), चोप (ता. देसाईगंज) नगरम-1 (ता. सिरोंचा) या रेती घाटांमधून रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र सदर घाटावरुन प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाणी रेती वाहतूक करणे खर्चीक ठरत असल्याने गावालगतच्या रेती उपलब्ध असलेल्या नदी-नाल्यातून 5 ब्रास रेती उपलब्ध करुन देण्या साठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे संयुक्त स्वाक्षरीने गावालगत उपलब्ध नदी-नाल्यांचे प्रस्ताव दिनांक 30 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा - अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे

Wed Apr 17 , 2024
– नोडल अधिकाऱ्यांचा आढावा गडचिरोली :- 12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी आपसी समन्वयाने काम करून ही लोकसभा निवडणूक शांततेत व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी आज दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा माधवी खोडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com