लाईफ लाईन हॉस्पिटलच्या घरफोडी प्रकरणात चौघास अटक ,मास्टरमाइंड अजूनही पसार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी कळमना मार्गावरील मरारटोली येरखेडा परिसरातील लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ तमीम फाजील मुक्तार अहमद यांचे कडे तिसऱ्या माळ्यावर घरफोडी करणाऱ्या चार आरोपीस नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली असून यातील पाचवा मास्टर माईंड आरोपी मो अक्रम दादा अजूनही अटकेबाहेर आहे.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी कळमना मार्गावरील मरारटोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ तमीम फाजील मुक्तार अहमद वय 43 हे कुटुंबासह लाईफ लाईन हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या माळ्यावर वास्तव्यास आहेत ते 25 मे 2024 ला कुटुंबासह कुल्लू मनाली येते फिरण्यासाठी गेले होते 30 मे ला पहाटे चार वाजता सुमारास आरोपी खालील अहमद कदिर अहमद वय 53 वर्ष , अंकित प्रकाश शेवंते वय 32 दोघेही राहणार वारीसपुरा कामठी ,कलीम खान इब्राहिम खान व 34 राहणार मोमीनपुरा नागपूर ,आकाश उर्फ आतून राजकुमार मिश्रा वय 30 वर्ष राहणार कॉटन मार्केट नागपूर गुन्ह्याचा मास्टर माईंड मुख्य आरोपी मोहम्मद अक्रम उर्फ दादा जमील अख्तर अन्सारी हा फरार असून यानी बिल्डिंगचे मागचे बाजूने प्रथम माळ्यावर चढून तिसऱ्या माळावर प्रवेश करीत घराचे प्रवेशद्वार तोडून बेडरूमच्या आत मधील कपाट फोडून कपाटातील नगदी 13 लाख 44 हजार रुपये घेऊन पसार झाले त्यादरम्यान दवाखान्यात लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये पाचही आरोपी कैद झाले आहेत आरोपी पसार होत असताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यांना ते दिसून आले त्या दरम्यान त्यांनी आरडा ओरड केली मात्र अंधार असल्याने पाचही आरोपी नाल्याच्या दिशेने पसार झाले.यासंदर्भात फिर्यादी ब डॉ तमील अहमद यांनी 31 मे 2024ला नवीन कामठी पोलीस स्टेशनला येऊन घरफोडीची तक्रार केली असता पोलिसांनी पाचही आरोपी विरुद्ध भादवी कलम 457 ,380 ,34 भावी नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारानुसार वरील चारही आरोपींना तीन दिवसांपूर्वी अटक करून त्यांचे जवळून नगदी एक लाख 98 हजार रुपये चार मोबाईल फोन , व एमएच 40 बीएक्स 3358, एमएच 40 बीझेड 3240 ह्या दोन हिरो होंडा मोटरसायकल एकूण तीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यातील मास्टर माईंड मोहम्मद अक्रम उर्फ दादा जमील अख्तर अन्सारी हा अजूनही फरार आहे. चारही आरोपी अट्टल चोरटे असून त्यांचे कडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे तपास अधिकारी एपीआय सचिन यादव यांनी सांगितले आहे. वरील कारवाई पोलीस उपायुक्त निकेतन कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल शिरसागर, ठाणेदार प्रमोद पोरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव ,देवगडे, खरबाण ,विशाल, आशिष भरकुडे, श्याम गोरले ,राहुल वाघमारे ,मोहम्मद नसीम, हेमचंद फोकमारे यांच्या पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा - माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर

Tue Jun 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रमानगर उडानपूल बांधकाम दरम्यान कामठी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भीमनगर येथील पाणी जलशुद्धीकरण केंद्राची पाईप लाईन अडसर ठरत असल्याने ही पाईप लाईन दुसऱ्या मार्गाने वळती करण्यासाठी कामठी नगर परिषद तर्फे पाणी पुरवठ्याला शहरात दोन दिवस ब्रेकडाऊन राहणार असल्याचे कारण सांगून पाईप लाईन वळती करण्याच्या कामाला गती देण्यात आली मात्र आज पाच दिवस लोटूनही हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com