कन्हान :- आंबेडकर चौकात दोव दुचाकीवरील चार अज्ञात इसमानी चैतन्य उके ला थांबवुन दुचाकीवर त्यास बसवुन कन्हान गाडेघाट रस्त्यावरी नाल्याचा पुला जवळ नेऊन त्यांचे जवळिल साठ हजार रूपये हिसकले व अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन तेथुन पसार झाल्याने कन्हान पोस्टे चार अज्ञात इसमा विरूध्द दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
शुक्रवार (दि.२०) डिसेंबर २०२४ ला चैतन्य केशव उके वय २० वर्ष धंदा. खाजगी नौकरी, रा. शिवनगर कन्हान हा मित्र सूमीत वानखेडे रा. कामठी यांचे कडे सांयकाळी ७ वाजता गेला होता. मित्रा जव ळुन ६०,००० /- रु. घेवुन कन्हान कडे येत असतांना रात्री ८ वाजता आंबेडकर चौकात दोन मोटर सायकल वर चार मुले आली. मला थाबवुन जबरदस्तीने त्यांचे मोटार सायकलवर बसविले. व त्याची मोटर सायकल त्यांच्या पैकी एकाने घेतली. आणि चैतन्य ला कन्हान गाडेघाटच्या नाल्याचा पुला जवळ नेऊन त्यांचे जवळी ल पैसे हिसकले व अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिले. मोबाईल व मोटर सायकल तिथेच सोडुन ते पळुन गेले . तेव्हा चैतन्य ने मित्राला फोन करून तेथे बोलाविले. मित्राने त्यास दवाखान्यात भर्ती केले. स्कार्फ बांधलेले चार अज्ञात इसमानी चैतन्य ला जबरदस्ती मोटर साय कल वर बसवुन नेवुन त्याचे जवळील नगदी ६०००० /- रु. हिसकले व अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्या च्या फिर्यादी चैतन्य केशव उके च्या बयानावरून कन्हा न पोलीस निरिक्षक कन्हान राजेंद्र पाटील यांच्या मार्ग दर्शनात पो हवा नरेश श्रावनकर हयानी चार अज्ञात इसमा विरूध्द पो.स्टे कन्हान ला अप क्र ९२६/२४ कलम ३०९(६), ३(५) बीएनएस अन्वये शनिवार (दि. २१) ला गुन्हा दाखल करुन कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.