संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- देशाच्या संसदीय राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारत देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयीं यांचा वाढदिवस कामठी शहर भाजप कार्यालयात सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक लालसिंह यादव ,माजी नगरसेविका संध्या रायबोले,माजी नगरसेवक कपिल गायधने,पंकज वर्मा,भाजपा कामठी शहर महामंत्री विजय कोंडुलवार,राजकुमार हाड़ोती ,उज्जवल रायबोले , कमलकीशोर यादव, गोपाल सिरिया , दिनेश शरण , देवानंद देशमुख , रवि चमके , आशु अवस्थी,सुमित शर्मा, कुणाल सोलंकी, नरेश पारवानी, यश कोंडे,प्रमोद कातोरे आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ता गण उपस्थित होते.