नागपूर :- माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला. ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी डॉ. यशवंत बाजीराव यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले. हलबा समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांची नागपूरमध्ये ओळख आहे. ‘केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हलबा समाजाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी सतत परिश्रम घेणाऱ्या गडकरी यांचे हात मजबूत करावे,’ असे आवाहन डॉ. यशवंत बाजीराव यांनी यावेळी केले. 1990 ते १९९५ या कालावधीत यशवंत बाजीराव हे मध्य नागपूरचे आमदार होते. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.