माजी नगराध्यक्ष रमेशभाऊ कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

चंद्रपूर – कामगार नेते, पूर्व नगराध्यक्ष स्व. #रमेशभाऊ_कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा माजी खासदार हंसराज अहिर यांच्या हस्ते आज 17 डिसेंबर रोजी पार पडले.

हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक श्री संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ अंचलेश्वर वॉर्ड येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धां सुरू आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संदीप आवारी, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती शीतल कुळमेथे, भाजपचे नेते खुशाल बोंडे, राजीव घरोटे, जीवन नंदनवार यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सहभागी चमूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धामधून नामांकित स्पर्धक घडावे व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा लौकीक वाढवावा अशी सदिच्छा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली. स्पर्धेसाठी विविध सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाला आयोजन समितीचे विजय खाडिलकर, महादेव कुंभारे़ उपस्थित होते.

रविवारी रात्री बक्षीस वितरण सोहळा

अंचलेश्वर वॉर्ड येथे आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोपीय सोहळा रविवार दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी वित्त मंत्री तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या चमूचा सत्कार करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते देशभरातील कलाकारांच्या 'एक्झिम बाजार' प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

Mon Dec 20 , 2021
देशभरातील हस्तकला – शिल्पकला कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवावे  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्राचीन भारत कला, शिल्पकला, मृद कला, वास्तुकला, काष्ठ कला, धातू कला,  वस्त्र कला अश्या ६४ कलांचे माहेरघर होते. दक्षिणेतील विविध मंदिरे तसेच अजंता – वेरूळसारख्या लेणी भारतीय कलाकारांनी साकारल्या होत्या. ब्रिटिशांनी स्वतःच्या व्यापाराला चालना देण्यासाठी देशातील विविध हस्तकला संपवल्या. या सर्व कलांचे पुनरुज्जीवन करून कारागिरांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे, असे आग्रही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com