मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजन : मनपा व लोटस कल्चरल असोसिएशनचा पुढाकार
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिका व लोटस कल्चरच अँड स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्याचा प्रेरणादायी इतिहास सांगणा-या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहराचे माजी महापौर दयाशंकर तिवारी या कार्यक्रमात ७५ क्रांतिवीरांच्या ७५ रोचक प्रसंगांचे वर्णन करणार आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे ७५ क्रांतिवीर जे कधीच कुठल्याही पाठ्यपुस्तकातून अथवा कुठल्याही माध्यमातून त्यांचे कार्य पुढे आलेले नाही अशा स्वातंत्र्य समरातील क्रांतिवीरांची क्रांतिगाथा दयाशंकर तिवारी सांगणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभिनव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.