संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 8 :- आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत भारतीय संविधान गौरव समिती कामठी च्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विकास रंगारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष नितीन रायबोले, महासचिवपदी माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील,सचिवपदी सुभाष सोमकुवर,कोषाध्यक्ष सुधा रंगारी यांची निवड करण्यात आली तर सल्लागार पदी उमाकांत चिमनकर, विजय पाटील ,ऍड चांदोरकर, दुर्योधन मेश्राम, रामचंद्र धोंगडे, विद्याताई भीमटे, मनोहर गणवीर,दिपणकर गनवीर,उदास बन्सोड, सुगत रामटेके, यांची निवड करण्यात आली.