संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भजयुमो चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कामठी येथील भाजप चे निष्ठावन्त तरुण तडफदार पदाधिकारी व कामठी नगर परिषद चे माजी नगरसेवक कपिल गायधने यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी थेट नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी नवनियुक्त भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव कपिल गायधने यांनी नियुक्ती केल्याबद्दल पक्षाच्या समस्त पदाधिकाऱ्याचे मनःपूर्वक आभार मानत भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असून प्रदेश सचिव पदी नियुक्ती केल्याबद्दल भाजप महाराष्ट्र .प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ,प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील प्रदेशाध्यक्ष युवा मोर्चा राहुल लोणीकर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश महामंत्री शिवानी ताई दानी,बादल कुलकर्णी,अनुप मोरे, माजी जी प सदस्य अनिल निधान,अजय अग्रवाल,आमदार टेकचंद सावरकर, मनिष वाजपेयी,आशिष फुटाणे,रोहित पारवे, संकेत बावनकुळे, पंकज वर्मा,राजेश खंडेलवाल,भाजप कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट सह आदींचे आभार मानले तर या नियुक्तीबद्दल कपिल गायधने यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.