नागपूर महानगरपालिका महिला तक्रार निवारण समितीचे गठण, अध्यक्षपदी डॉ. भावना सोनकुसळे सचिवपदी अलका गांवडे यांची नियुक्ती 

नागपूर : महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी मनपा महिला तक्रार निवारण समितीचे (Internal Complaint Committee for Prevention of Sexual Harassment) गठण करण्यात आले आहे. समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भावना सोनकुसळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सचिवपदी अलका गांवडे आहेत.

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरीक्त आयुक्त डॉ. राम जोशी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, समितीच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. भावना सोनकुसळे, सदस्य सचिव अलका गांवडे यांच्या उपस्थितीत शुक्रवार (ता. ६) रोजी महापालिकेच्या मुख्य इमारतीत मनपा महिला तक्रार निवारण समिती फलकाचे अनावरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात तसेच मनपाच्या विविध विभागात समितीचे फलक लावून, महिलांना समितीबाबत माहिती देण्यात यावी अशा सूचना यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केल्या. मनपा अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास, समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्ष डॉ. सोनकुसळे यांनी यावेळी केले. समितीतील इतर सदस्यांमध्ये सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, इस्टर शिंदे,  कल्पना महल्ले, अॅड. सुरज पारोचे आणि अॅड. स्मिता सिंगलकर यांचा समावेश आहे.

महिला तक्रार निवारण समितीकडे (ICC) येणाऱ्या पिडीत व्यक्तींच्या संरक्षणाची व गुप्ततेची काळजी घेतली जाईल, चौकशीनंतर आरोपी व्यक्ती दोषी आढळल्यास शिस्तभंगाई कारवाई करण्यात येईल, ज्यामध्ये निलंबनाची कारवाई होऊ शकते. कामाच्या ठिकाणी पुरुष सहकाऱ्याकडून अथवा प्रमुखाकडून, लैंगिक छळ होत असल्यास, महिलांनी त्वरीत तक्रार दाखल करावी असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने करण्यात आले.

लैंगिकता सूचक शारिरीक स्पर्श, अश्लील फोन, अश्लील बोलने, लैंगिकता सूचक शेरे मारणे, अश्लील विनोद सांगणे, टक लावुन पाहणे, अनावश्यक खर्च, चुकून शरीराच्या विशिष्ट अवयवांना स्पर्श करणे, घसटणे, अती जवळ येणे, अश्लील वा धमकीची पत्रे पाठवणे, ऑफीस, बाथरूम, लिफ्टच्या भिंतीवर लिखाण किंवा चित्र लावणे इत्यादीबाबत तक्रारी असल्यास, महिला कर्मचाऱ्यांनी मनपा, धरमपेठ झोन क्रमांक २, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्याशी संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रभाग 04 में हुवा सीमेंट रोड का लोकार्पण

Sat Jan 7 , 2023
नागपूर :-भाजपा प्रभाग 04 में आ कृष्णा खोपड़े इनके स्थानीय विकास निधि से नगरसेविका मनिषा अतकरे इनके प्रयासोसे प्रभाग के गोकुलधाम सोसायटी, भरतवाड़ा में 50 लाख रुपये के सीमेंट रोड का लोकार्पण कार्यक्रम लिया गया इस अवसर पर प्रमुखता से उपस्थित आ कृष्णा खोपड़े, भाजपा पूर्व नागपुर अध्यक्ष संजय अवचट, महामंत्री सेतराम सेलोकर, नगरसेविका मनिषा अतकरे, संयोजक अरुण हरोडे, दिलीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!