नाशिकच्या अनाथ आश्रमातील लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून सात दिवसात अहवाल सादर करा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बल्‍लारपूर दुर्घटनेतील मृत शिक्षिकेच्या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री निधीतून 5 लाखांचे अर्थसहाय्य

Mon Nov 28 , 2022
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विनंती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मान्‍य मुंबई :- बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवर पादचारी पुल कोसळल्‍याने झालेल्‍या दुर्घटनेतील मृत शिक्षिका रंगारी यांच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्‍याचप्रमाणे जखमींवर शासकीय खर्चाने योग्‍य उपचार करण्‍याचे निर्देश त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेत. रविवारी दुर्घटनेनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com