वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देवलापार गो-विज्ञान अनुसंधान संशोधन केंद्रास भेट

नागपूर :- वने, सांस्कृतिक कार्य ,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध विकास कामे व उपक्रमांच्या उद्घाटनानंतर मुनगंटीवार यांनी सायंकाळी गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली. ॲड. आशिष जयस्वाल, गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता, मुख्याधिकारी डॉ मनोज तत्ववादी, कोषाध्यक्ष हितेंद्र चोपकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, नागपूर वन वृत्ताच्या वनसंरक्षक लक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.

मुनगंटीवार यांनी येथील कामधेनु पंचगव्य आयुर्वेद भवनाची पाहणी केली. येथील अवलेह विभाग, वटी विभाग, तेल विभाग, इंधन विभाग, सिरप विभाग, प्रयोगशाळा आदींना भेट दिली. येथे निर्माण होणारे फलघृत, हिंग्वाद्यघृत, अष्टमंगलघृत, गोमुत्र अर्क, दंतमंजन आदी 30 पेक्षा जास्त उत्पादनांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी अनुसंधान केंद्राच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, या आयुर्वेद भवनाच्या परिसरात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४

Sat Feb 17 , 2024
– शिवनेरी येथे १७ ते १९ फेब्रुवारी कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन – पर्यटन मंत्री गिरीश महाजन मुंबई :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची संस्कृती, समृद्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com