वाघाच्या मृत्यूबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली तातडीची बैठक

– विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिले वनाधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर :- विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

काल गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी आज नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सांगितले.

यावेळी वनमंत्री यांनी वन विकास महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेऊन ही कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली रमेश कुमार इ. अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'डेफ किड्झ गोल' चा थाटात समारोप

Sat Oct 28 , 2023
नागपूर :- स्लम सॉकर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आयोजित डेफ किडझ गोल प्रकल्पाचा समारोप समारंभ चिटणवीस सेंटर सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. डेफ किड्झ इंटरनॅशनलचे जॅझ मान या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. हा प्रकल्प भारतात आणण्याच्या योजनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. दुभाषी जेन आणि त्‍यांची सल्लागार तान्या देखील उपस्थित होत्या. गेल्या चार वर्षात नागपूरच्या 5 मूकबधिर शाळांमध्ये ही संस्था चालविण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com