वन शहीद स्वाती ताई ढूमने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना श्रध्दांजली

चंद्रपुर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे शासकीय कर्तव्यावर असताना कु. स्वाती ताई ढूमने व वनमजुर यांचेवर माया नामक वाघिनिने अचानक हल्ला केला त्यात दुर्दैवाने स्वाती ताई ढूमने यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वणपाल संघटना नागपूर यांचे वतीने वन शहीद स्वर्गवासी स्वाती ताई ढूमने यांना आज दिनांक 21/11/ 21 रोजी जपानी गार्डन सेमिनरी हिल्स, नागपूर येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. वनरक्षक, वनपाल, वनमजूर यांचे वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी वन शहीद स्वाती ताई ढूमने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.

प्रसंगी वनरक्षक, वनपाल, वनमजूर व इतर वन कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी संघटनेच्या वतीने श्री. अजय भाऊ पाटील यांनी तात्काळ व्याघ्र गणनेची  कामे थांबवणे तसेच जोपर्यंत एका वनरक्षक सोबत कमीत कमी 5 वनमजूर यांचा गट सोबत दिल्याशिवाय सदर कामे सुरू करू नये त्याच प्रमाणे वन शहीद स्वाती ताई ढूमने यांच्या पश्चात त्यांच्या पतीला तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेणे आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांच्या नावे प्रत्येकी 50 लाख रुपये फिक्स डीपॉझिट करून ते जेंव्हा 21 वर्षाचे होतील तेंव्हा त्या रकमेचा फायदा त्यांना झाला पाहिजे आणि तोवर त्या रकमेच्या व्याजावर त्यांचे शिक्षण होईल अशी व्यवस्था शासनाने करावी, इत्यादी मागण्या संघटनेच्या वतीने श्री. अजय पाटील यांनी केल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्वच्छ अमृत महोत्सवात चंद्रपूरचा गौरव थ्री स्टार नामांकन

Sun Nov 21 , 2021
चंद्रपूर :- स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सवा’मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यात  कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3- तारांकित (थ्री स्टार) नामांकनमध्ये चंद्रपूर शहराचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे पार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com