संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-लोकप्रिय बाबू हरदास एल एन व कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे पुण्यस्मूर्ती उत्सव निमित्त आढावा बैठक संपन्न
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जयभीम चे जनक बाबू हरदास एल एन व बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती उत्सवा निमित्त 15 जानेवारी 2024 ला हरदास उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .हा उत्सव मेळावा मागिल 84 वर्षांपासून साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमा अंतर्गत प्रामुख्याने मानवंदना, पालखी, लेझीम पथक व अखाडा मिरवणूक ,सांस्कृतिक कार्यक्रम, आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.त्यानिमित्त माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली व पुज्यनिय भन्ते नागदीपंकर यांच्या मुख्य उपस्थितीत आज 27 डिसेंबरला ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
या आढावा बैठकीत बाबू हरदास एल एन व ऍड दादासाहेब कुंभारे पुण्यस्मूर्ती उत्सवाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलीस प्रशासनाने योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच या हरदास मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून आपले मौलिक कर्तव्य पार पाडावे असे निर्देश माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले. दरम्यान उपस्थित दोन्ही पोलीस अधिकाऱ्यासह उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर उत्सव कार्यक्रमाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे सहमती दिली.
तसेच या बैठकीत 15 जानेवारीला निघणारा पालखी मिरवणुकीचा मार्ग, वेळेचे नियोजन,हरदास घाट कन्हान येथील सुव्यवस्था इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर,नायब तहसीलदार अंबादे, नगर परिषद अभियंता तसेच हरदास नगर येथील हरदास व्यायाम शाळा व प्रशिक्षण केंद्र,कुंभारे कॉलोनी नवीन कामठी येथील दादासाहेब कुंभारे अखाडा,जयभीम चौक येथील प्रशिक अखाडा मंडळ ,देवाजी वस्ताद/गणपतराव वस्ताद अखाडा,नया बाजार इमली बाग कामठी चे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.