विधानभवन परिसरात 25 व 26 जानेवारीला ‘पुष्प प्रदर्शन’

Ø 10 जानेवारी पासून प्रवेश अर्ज उपलब्ध

नागपूर :-  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवने व उद्यान शाखेमार्फत 25 व 26 जानेवारी 2025 रोजी विधानभवन परिसरात 50 व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पुष्प प्रदर्शनात भाग घेण्यासाठी येत्या 10 जानेवारी पासून शासकीय रोपवाटिकेतून प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहे.

या पुष्प प्रदर्शनात गुलाब व हंगामी फुले, कॅक्‌टस, सक्कुले, शोभिवंत फुलझाडांच्या कुंड्या, पुष्परचना प्रदर्शित होणार आहे. या प्रदर्शनात पुष्प्‍ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी आहे. तर पुष्पप्रदर्शनात भाग घेण्यासाठी सशुल्क प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी आहे.

इच्छुकांनी सहायक संचालक उपवने व उद्याने, बांधकाम संकुल, बंगला क्र.39/1 , लेडीज क्लब समोर, सिव्हील लाईन, नागपूर येथे 10 जानेवारीपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन दिवसांमध्ये अर्ज घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी 0712-256125 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. उद्यान प्रेमींनी जास्तीत-जास्त प्रवेशिका नोंदवून सहभाग घेण्याचे आवाहन, सहायक संचालक उपवने व उद्याने प्रसाद कडुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोकण भवनात भारतीय प्रजासत्ताक दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न

Mon Jan 6 , 2025
नवी मुंबई :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेचे अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत सिडको अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी विजय राणे, उद्यान अधीक्षक विशाल भोर, पनवेल महानगर पालिकेचे दशरथ भंडारी,नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सुलभा बारघरे,रायगड विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.डी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!