25 व 26 जानेवारीला विधानभवनात पुष्पप्रदर्शन 

नागपूर : उपवने व उद्याने सार्वजनिक प्रादेशिक विभाग नागपूर कार्यालयाच्या वतीने दरवर्षी शासनाचा उपक्रम म्हणून या वर्षी 25 व 26जानेवारीला विधानभवन नागपूर येथे 48 पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुष्पप्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रवेश अर्ज 10 जानेवारी पासून कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. उद्याने प्रमींनी व जनतेनी याची नोंद घ्यावी. उद्यान स्पर्धेसाठी प्रवेशअर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी असून पुष्पप्रदर्शनासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी आहे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 2561425 वर संबंधितांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे उपवने व उद्याने विभागाचे सहाय्यक संचालक प्रसाद कडुलर यांनी कळविले आहे. या कार्यालयाच्या वतीने विधानभवन आवारात पुष्पप्रदर्शनाचे ठिकाणी शोभीवंत झाडे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. उद्यान प्रेमी व जनतेनी याची नोंद घेवून जास्तीत जास्त प्रवेशिका नोंदवून सहभाग नोंदवावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

A grand job fair in Kurla 

Sat Jan 7 , 2023
Kurla :-In association with Kurla Police Station and Transglobal Entrepreneur Chamber of Commerce and Industries for Agriculture, RTI activist Anil Galgali inaugurated a grand employment fair and employment guidance camp organized for police children and unemployed needy at Kurla West Shri Kachchivisa Hall in memory of late Matoshree Byakkabai Dagdu Howale. Senior Police Inspector Ravindra Dagdu Howale of Kurla Police […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com