जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.            मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात जलवाहतुकीस प्रोत्साहन देण्यात येत असून मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, पार्किंग लॉन्स, प्रतिक्षालये व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील. याव्दारे पर्यटन विकासालाही अधिक चालना मिळेल. यांसारख्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. सर्व संबंधित विभागांनी यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकायुक्त के आदेश की अवहेलना कर रहे मनपाआयुक्त राधाकृष्णन बी 

Sat Jun 10 , 2023
– वर्त्तमान राज्य सरकार का प्रशासन पर ढीली पकड़ का नतीजा,RTI के स्पष्ट जवाब देने में आनाकानी कर रही नागपुर मनपा का PWD/SPECIAL PROJECT DEPARTMENT,संदिग्ध/विवादास्पद अधिकारी मनोज तालेवार को संरक्षण देकर उसकी जिम्मेदारी बढ़ा रहे  नागपुर :-नागपुर महानगरपालिका के वर्त्तमान मनपा आयुक्त राधाकृष्णन बी के कार्यकाल में कोई उपलब्धि तो नहीं हुई बल्कि सीमेंट सड़क फेज -2 और स्टेशनरी घोटाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!