– देशभावना वृद्धिंगत करण्यासाठी अभियान..
– नागरिकांनी ध्वज खरेदी करण्याचे आव्हान..
कामठी ता प्र 5 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’अभियान 13 ते 15 ऑगस्ट ता कालावधीत राबविण्यात येत आहे.नागरिकांना तिरंगा ध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी कामठी नगर परिषद कार्यालयात तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्राचे उदघाटन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी उपमुख्याधिकारी नितीन चव्हाण, बांधकाम अभियंता विक्रम चव्हाण, कर अधीक्षक आबासाहेब मुंडे, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां,अग्निशमन पर्यवेक्षक निलेश वाडेकर, प्रदीप भोकरे, अमोल कारवटकर,दर्शन गोंडाने, वीरेंद्र ढोके, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभावना वृद्धिंगत करण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वा वर्ष अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा यासाठी कामठी नगर परिषद कार्यालयातून ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे.तेव्हा नागरिकांनी ध्वज खरेदी करावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.