अरोली :- येथून जवळच असलेल्या कोदामेंढी येथे विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयात व इतरही ठिकाणी ध्वजारोहण करून 76 वा गणराज्य दिन शांततेत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नेहमीप्रमाणे सर्वप्रथम वार्ड क्रमांक चार येथील बाजार चौकात काँग्रेस सेवा दलातर्फे माजी सरपंच उमाकांत देवतळे यांच्या हस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका रॉय यांच्या हस्ते, साईबाबा पतसंस्थेत संस्थाध्यक्ष बाळकृष्ण पंचभाई यांच्या हस्ते, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य चंद्रशेखर शिवणकर यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर राऊत यांच्या हस्ते, आदर्श प्राथमिक शाळेत संस्था पदाधिकारी मेश्राम यांच्या हस्ते, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आशिष बावनकुळे यांच्या हस्ते, भोयर कॉन्व्हेंट मध्ये सामाजिक कार्यकर्ते रामबाबू देवनीनी यांच्या हस्ते व इतरही ठिकाणी ध्वजारोहण शांततेत उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक हटवार, माजी सरपंच भगवान बावनकुळे, माजी उपसरपंच प्रकाश भगवान मेश्राम, भाजपा तालुका पदाधिकारी नरेश बावनकुळे , उपसरपंच गोपाल गिरमेकर , तंटामुक्त अध्यक्ष राम निमकर, पोलीस पाटील प्रकाश देवतळे,माजी तंटामुक्त अध्यक्ष कैलास बावनकुळे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष विवेक देवतळे, प्रतिष्ठित नागरिक वसंतराव उरकुडकर ,जिल्हा परिषद हायस्कूल व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिक्षिका कौशिक, व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमराज बावनकुळे, व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य खुशाल शिवणकर, साईबाबा पतसंस्थेचे व्यवस्थापक भैय्या बावनकुळे , माजी ग्रामपंचायत सदस्या कल्पना मेश्राम सह सर्व ग्रामपंचायत सदस्य गण ,गावातील सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण, गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद मान्यवर सह गावातील महिला पुरुष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.