नागपूर :- गड्डी गोदाम मोहननगर नागपुर येथील, सन 1926 साली, दिवंगत आदिवासी महिला समाजसेविका झुललाबाई मडावी यांनी आदिवासी महिलांच्या शिक्षणा करिता “गोंड सभा पाठशाला” ची स्थापना केली होती. त्या काळाची इमारत आजही मजबुतीने उभी आहे. या शाळेतील प्रांगणात 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने 26 जानेवारी 24 रोजी आदिवासी नेते कृष्णराव परतेकी माजी उपमहापौर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. याप्रसंगी सर्वश्री टीकाराम पेंदाम, प्रभूलाल परतेकी, ॲड. सुरेश वरकडे, ललित पवार, दिलीप मडवी, शेषनारायण सलामे, मिथिलेश कंगाली, नंदाताई सयाम, लक्ष्मी पवार, शंभू गोंड कोहचाडे, शीला सडमाके, ॲड.निकीता वरकडे,निशीकांत वरकडे इत्यादी अनेक मान्यवर आदिवासी नेते / कार्यरकर्ते बांधव उपस्थित होते.